बुलडाणा प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य जाहीर सभा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम राहणार असून, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद आण्णा शेळके, प्रदेश उपाध्यक्ष दौलत दादा खरात, माजी महापौर तथा राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर थोरात, जेष्ठ नेते संजय ठोकळ, संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष विजय मगरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालकृष्ण इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ज्वलंत प्रश्नांवर मार्गदर्शन
सभेमध्ये पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे:
दलित, पीडित व गोरगरीब जनतेचे प्रश्न
फुले महामंडळ व महात्मा साठे महामंडळाची प्रलंबित कर्ज प्रकरणे
महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना
गायरान जमिनी भूमिहीनांच्या नावावर करण्याबाबत भूमिका
रमाई आवास योजनेअंतर्गत बेघरांना हक्काची घरे
या विषयांवर डॉ. रामदास आठवले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमाचीही मेजवानी
सभेनंतर प्रख्यात आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्राच्या लोकगायिका कडूबाई खरात यांचा सांस्कृतिक प्रबोधनपर गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उपस्थितीचे आवाहन
रिपाई गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे, जे. के. आमराव, चेतन सोनवणे, बाबासाहेब भरपुरे, बापू खाजेकर, सचिन गायकवाड, मंगेश काशीदे आदींनी वाळूज (संभाजीनगर) महानगर, गंगापूर तालुका व संभाजीनगर जिल्ह्यातील रिपाई व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
Users Today : 38