देऊळगाव राजा येथे ‘भावनांच्या लाटा’ कवितासंग्रहाचे उत्साहात प्रकाशन

KHOZ MASTER
2 Min Read

दे. राजा प्रतिनिधी :

येथील सुप्रसिद्ध कवी रमेश नरोडे यांच्या ‘भावनांच्या लाटा’ या बहुचर्चित कवितासंग्रहाचे भव्य आणि साहित्यिक वातावरणात मोठ्या उत्साहात प्रकाशन संपन्न झाले. ग्रामीण साहित्यिक डॉ. प्रभाकर शेळके यांच्या शुभहस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास भाष्यकार डॉ. भगवान खरात, प्रमुख अतिथी म्हणून व्यंकटेश महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव, तसेच के. पी. खांडेभराड व गोविंद बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते.
कवी रमेश नरोडे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती सौ. रत्नमाला नरोडे यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष शोभा देणारी ठरली. प्रकाशन सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. ज्योती देशमुख यांनी केले. प्रास्ताविक के. पी. खांडेभराड यांनी तर आभारप्रदर्शन मधुकर शेळके यांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी कवी रमेश नरोडे व सौ. रत्नमाला नरोडे या दाम्पत्याचा यथोचित सत्कार करून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला.
रंगतदार कवी संमेलन
प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रकार मुशिरखान कोटकर, सुरज गुप्ता आणि डॉ. ज्योती देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात प्रा. सुभाष मगर, शेख बिस्मिल्ला सोनोशी, जयदीप विघ्ने, प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे, अॅड. वर्षा कंकाळ, विजय दळवी, अरविंद कुलकर्णी, सुखदेव साळवे, नंदलाल शर्मा, डॉ. भगवान खरात व डोईफोडे सर यांनी आपल्या प्रभावी कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमासाठी पत्रकार मुन्ना ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. तसेच दिनकर जाधव, चव्हाण सर, बाबुलाल शिवरकर, घिगे सर, खुलते सर, निरज पारीख, राजेश भन्साली, सय्यद सर, अल्ताफ कोटकर, दनदाले सर, सुधीर जाधव, सपाटे सर आणि सचिन मापारी यांचीही उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
‘भावनांच्या लाटा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनामुळे देऊळगाव राजा येथील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, कवी रमेश नरोडे यांच्या शब्दसृष्टीला नव्या वाचकांची साथ लाभेल, अशी भावना रसिकांनी व्यक्त केली

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *