महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुभारंभ

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :

आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. चिखली मतदारसंघातील जनतेच्या समस्या मांडण्यासाठी विधिमंडळ भवनात उपस्थित राहण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपस्थित आमदारांनीही महाराजांना अभिवादन केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत विविध विकासकामे, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी अर्थसंकल्पीय तरतुदी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जनतेच्या अपेक्षा आणि विकासाच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असून, चिखली मतदारसंघाच्या हितासाठी प्रभावी पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

0 9 7 2 2 8
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *