संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त चिखलीत सखोल स्वच्छता अभियान

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :

कीर्तनातून समाजप्रबोधन करत स्वच्छतेचा संदेश देणारे महान कृतीशील संत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज चिखली नगरपरिषद यांच्या वतीने शहरात सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, बाजारपेठ परिसर तसेच इतर भागांमध्ये स्वच्छता करण्यात आली. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत संत गाडगे महाराजांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या अभियानात नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष सौ. वैशाली कपिल खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुषमा विलास चव्हाण, सौ. प्रिया राम बनसोडे, श्री. विष्णू जोगदंडे यांसह नगरपरिषदेतील इतर नगरसेवक सहभागी झाले होते.
स्वच्छता हीच खरी सेवा, हा संत गाडगे महाराजांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत नगरपरिषदेने समाजात सकारात्मक जनजागृती घडवून आणली.

0 9 3 4 2 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *