खामगावात महाज्योतीसाठी १,००० कोटींची मागणी; ओबीसी युवा महासंघाचा इशारा

KHOZ MASTER
2 Min Read

खामगाव प्रतिनिधी :

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) (महाज्योती) यांना एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने शासन निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार यांनी Devendra Fadnavis यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले. त्यांनी म्हटले आहे की, संविधान चौक येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने १४ मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथील Sahyadri Guest House येथे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री Atul Save यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.
या बैठकीस विधान परिषदेचे आमदार परिणय फुके, डॉ. बबनराव तायवाडे, सचिन राजुरकर तसेच विविध विभागांचे सचिव व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महासंघाच्या १४ मागण्या तत्त्वतः मान्य करण्यात आल्याचे बेलोकार यांनी नमूद केले.
मात्र अतिवृष्टीसंदर्भातील मागणी वगळता इतर मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः मागणी क्रमांक ५ नुसार महाज्योती संस्थेस एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे शासनाने कबूल केले असतानाही अद्याप निधी न मिळाल्याचे सांगण्यात आले. निधीअभावी संस्थेमार्फत एकही नवीन योजना सुरू झालेली नसून लाखो ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अपेक्षांवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाज्योतीसाठी जाहीर निधीची तरतूद करण्यात यावी; अन्यथा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री निवासस्थानासमोर ‘भीक मांगो आंदोलन’ छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे

0 9 3 4 2 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *