खामगाव प्रतिनिधी :
शहरातील डी.पी. रोड परिसरातून २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
शिवानी धर्मेंद्र तिवारी (वय २३) ही २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास ‘मैत्रिणीकडे जाऊन येते’ असे सांगून घरातून स्वतःची स्कूटी घेऊन बाहेर पडली. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच शहरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला; मात्र २४ तास उलटूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
या प्रकरणी राजेश्वरी तिवारी यांनी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ‘मिसिंग’ची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद शेळके करीत आहेत.
ओळख विवरण
उंची : अंदाजे ५ फूट ६ इंच
बांधा : सडपातळ
रंग : गोरा
अंगावरील कपडे : हिरवट-कथ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व केशरी रंगाचा दुपट्टा
शिवानीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने खामगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 6