सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. जाधव यांचे आत्मचरित्र “भास्कररायण”प्रकाशन समारंभ उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता,२४
येथील विनायकराव पाटील महाविद्यालयालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य बी.एस. जाधव यांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक “भास्कररायन”रविवार(
ता,२२)रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले.अध्यक्षस्थानी
काँग्रेसचे जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे होते, तर व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विश्वकोशनिर्मिती मंडळ (नागपूर ) रवींद्र शोभणे,माजी नगराध्यक्षा शिल्पाताई
दिनेश भाऊ परदेशी भगवान तांबे यांची उपस्थिती होती.भाऊसाहेब ठोंबरे यांनी यावर बोलताना बी.एस. जाधव यांच्या चरित्र पुस्तकातील अनेक घटनांत्मक प्रसंग विशद करून ,जाधव यांच्या अगदी आरंभापासून ते सेवा निवृत्त काळपर्यंत च्या घटना व प्रसंग विशद केले.जाधव यांच्या पत्नी सौ, सुवर्णा उर्फ शोभा जाधव यांनी प्रास्ताविक केले.या आत्मचरित्रावर महेश खरात व सचिन तायडे यांनी भाष्य केले. या प्रसंगी सरांचे विद्यार्थी यु.के.पुणे,जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत ,रुपेश भालेराव, संतोषी भालेराव, बाबासाहेब गायकवाड,पी.वाय, चव्हाण,शीतल रोजेकर,रामकृष्ण साठे यांनी जाधव व त्यांच्या पत्नीचा विषेश सत्कार केला.या कार्यक्रमात सेवा निवृत्त प्राध्यापक मधुकर हजारे, एन. के.पाटील, पी.जी.श्रीवास्तव, तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

0 9 3 4 2 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *