इद्रीसजी मुलतानी यांची भाजप प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा पदावर पुनर्निवड सिल्लोड–सोयगावच्या भूमिपुत्रावर पुन्हा एकदा पक्षाचा विश्वास जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या इद्रीस मुलतानी यांना पुन्हा जबाबदारी

KHOZ MASTER
1 Min Read

 

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सिल्लोड व सोयगाव तालुक्याचे भूमिपुत्र, जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच ठाम भूमिका घेणारे व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करणारे आदरणीय इद्रीसजी मुलतानी यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा पदावर पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्निवडीमुळे सिल्लोड व सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इद्रीस मुलतानी यांनी पक्षनिष्ठा, प्रामाणिक कार्यशैली आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांच्या जोरावर पक्षामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणे आणि विकासकामांना गती देणे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाला बळ मिळणार असून विकासाच्या दृष्टीने अधिक प्रभावी कार्य होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
इद्रीसजी मुलतानी यांच्या पुनर्निवडीबद्दल पदाधिकारी,कार्यकर्ते व जनतेनेही यांनी अभिनंदन व्यक्त करत, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.

0 9 3 4 2 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *