छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजी नगर
बांधकाम कामगारांना लुटणारे दलाल पुन्हा सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे शासनाच्या विविध योजना लाभ घेण्यासाठी सुरक्षा संच व घरगुती भांडे मिळवण्यासाठी कामगार गोडाऊनवर जाताच काही दलाल त्यांना गाठतात आणि “प्रक्रिया शुल्क”” नोदनी खर्च” किंवा सुरक्षा संच्याचा खर्च अशा नावाखाली हजार पाचशेची मागणी करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे शासनाचा योजनेअंतर्गत (हेल्मेट बूट चटई )घरगुती संसार उपयोगी साहित्य मोफत मिळने अपेक्षित आसतानि प्रत्यक्ष मात्र कामगाराकडून आर्थिक लुटीचा प्रकार समोर येत आहे
काही महाभाग दलालाने तर घरातच गोडाऊनन टाकले आहे .
पैसे न दिल्यास साहित्य मिळणार नाही अशी भीती दाखवून दबाव टाकले जात असल्याची माहिती आहे.
गरीबीशी दोन हात करत रोजंदारीवर जगणाऱ्या मंजुरा कडून अशा प्रकारे पैसे उकळले जात असताना संबंधित विभागातील अधिकारी यावर दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित कामगार आयुक्त यांनी तातडीने लक्ष घालून गोडाऊन परिसरातील कारभाराची सखोल चौकशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणी कामगार आयुक्त यांच्या व संबंधित विभागातील अधिकारी यांच्या वरदहास्थामुळे गोडाऊन चालकावर जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे का यावर दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे वितरनाचि अधिकृत प्रक्रिया जाहीर करावी आणि शुल्क आकारण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी गोडाऊन परिसरात दरालांचा मुक्त वावर कोणाच्या आशीर्वादाने याचीही चौकशी होणे आवश्यक आहे काही कामकामगारांच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांपासून अनेक लाभाच्या एवढा रखडल्या होत्या आता त्या सुरू सुरू होताच दलालानी संधी साधून कमाईचे साधन उभे केले आहे शासनाच्या नावाखाली जर गरीबाची फसवणूक होत असली तर संबंधितावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावेत अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा प्रशासनावरील विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे
गरीब बांधकाम कामगारांच्या कामगारांच्या टाळु वरचे लोनि खाणार्या दलालाविरुद्ध प्रशासन ठोस पावली उचलणार का हा प्रश्न सध्या छत्रपती
जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे
“छत्रपती संभाजी नगर मध्ये तर खाजगी व्यक्तीच्या घरातच बांधकाम कामगार साहित्याची गोडाऊन”
छत्रपती संभाजी नगर मधील पायलट बाबा नगरीतील हे गोडाऊन अनाधिकृत व्यक्तीच्या घरातच कसे थाटले घरातूनच बांधकाम साहित्याचे वाटप कशाप्रकारे चालते यात काही अधिकारी सहभागी आहेत का याची चौकशी होणे ही गरजेचे आहे.
पायलट बाबा नगरीतील हे गोडाऊन एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईकाची असल्याची बोलली जात असल्यामुळे परिसरात त्याची मोठ्या प्रमाणात दहशत माजल्याची दिसून येत आहे
नेमका तो पुढारी कोण याची चौकशी होणे ही गरजेची आहे
Users Today : 6