चेन्नईत पाळधीच्या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

KHOZ MASTER
1 Min Read

 

पाळधी (ता. जामनेर) –

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून अप्रेंटिशिपसाठी चेन्नई येथे गेलेल्या पाळधी येथील जय नरेंद्र पाटील (वय अंदाजे २२) याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांसह समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटेमुळे तो पाण्यात वाहून गेला.

घटनेनंतर बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी साडेनऊ वाजता जयचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे.

जय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील शेती व्यवसाय करतात, तर आई शिक्षिका आहेत. मृतदेह पाळधी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली

0 9 3 4 2 4
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *