आज राष्ट्रपतींचा शेगाव दौरा ३ हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

KHOZ MASTER
2 Min Read

विशेष प्रतिनिधी :

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज शेगाव येथे येणार असल्याने संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३ हजाराच्या वर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून ३० जिल्ह्यांतील पोलिस पथके, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) तसेच विशेष सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे, बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर कडक तपासणी सुरू आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असून सीसीटीव्हीद्वारे सतत निरीक्षण ठेवले जात आहे. संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती श्री गजानन महाराज मंदिरात येत असल्याने मंदिरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर, बॅगेज स्कॅनिंग यंत्रणा तसेच स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान काही काळासाठी सामान्य दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रपती हेलिपॅडवरून मंदिरकडे जाणार असल्याने संबंधित संपूर्ण मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. या मार्गावर २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी नियमित बैठका घेऊन संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवत आहेत. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना व स्वयंसेवी संस्थांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे शेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून स्वागत फलक लावण्यात आले आहेत. प्रशासनाच्या तयारीमुळे शहरात शिस्तबद्ध व नियंत्रित वातावरण दिसून येत आहे.

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *