मंठा तालुक्यातील केंधळी गावासह इतर गावांना स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

 

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा तालुक्यातील केंधळी, पाकणी, वीरगव्हाण, किर्तापूर, एरंडेश्वर आदी गावांमध्ये आजपर्यंत स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही संबंधित गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो. ही बाब मानवी हक्कांशी निगडीत असून प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

0 9 3 4 5 8
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *