बारामती येथे राज्यस्तरीय ‘Artificial Intelligence & Machine Learning’ परिसंवादाचे आयोजन

KHOZ MASTER
3 Min Read

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

इंदापूर ;
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता सुधार कार्यक्रम (Quality Improvement Program) अंतर्गत ‘Artificial Intelligence & Machine Learning’ या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. हा परिसंवाद शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वा. हॉटेल कृष्णसागर सेमीनार हॉल येथे होणार आहे.
महाविद्यालयास NAAC कडून तिसऱ्या चक्रात B+ मानांकन प्राप्त झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम राखत आधुनिक तंत्रज्ञान विषयावर हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवोन्मेषी, शाश्वत आणि समतोल भविष्य घडविण्याच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे.
AI च्या साहाय्याने उत्पादकता वाढ, निर्णय प्रक्रियेतील अचूकता,उद्योग-व्यवसाय, अर्थव्यवस्था, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, राजकारण आदी क्षेत्रातील बदल या विषयावर व्याख्याते प्रा.राहुल शहा,डॉ.प्रदिप पैठणे, डॉ राहुल चाकरे तसेच मुधोजी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ पंढरीनाथ कदम,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, विद्या प्रतिष्ठान कंप्यूटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. किशोर ढाणे ,विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांचे मार्गदर्शन होणार आहे. संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव विरसिंह रणसिंग,खजिनदार विरबाला पाटील,विश्वस्त कुलदीप हेगडे ,विश्वस्त विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त सौ राही रणसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेत कॉमर्स: AI in Entrepreneurship, E-Commerce, Accounting & Financial Reporting
सायन्स: AI & Cyber Security, Quantum Computing, Robotics
भूगोल: आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन, हवामान बदल,इतिहास: ऐतिहासिक संशोधनात AI चा वापर,अर्थशास्त्र: भारतीय व जागतिक अर्थव्यवस्थेवर AI चा प्रभाव
राज्यशास्त्र: लोकशाही प्रक्रिया,मानवाधिकार व AI,इंग्रजी व साहित्य: भाषा शिक्षण व अध्यापनातील AI,मानसशास्त्र: मानसिक आरोग्य व भावनिक बुद्धिमत्ता ,शारीरिक शिक्षण: क्रीडा क्षेत्रातील AI,ग्रंथालय शास्त्र: स्मार्ट लायब्ररी व डिजिटल माहिती प्रणाली
स्वीकृत संशोधन निबंधांना Peer-reviewed International Journal मध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयांशी परिचित करून देण्यासाठी हा राज्यस्तरीय परिसंवाद महत्त्वाचा टप्पा ठरणार असून संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन परिसंवादाचे समन्वयक डॉ. पी. एस. शिंदे व प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी केले आहे.

0 9 3 4 5 8
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *