ना रुग्णवाहिका. . . ना शववाहीका . . . विकास कामांच्या केवळ वल्गना ; मरणानंतरही सरत नाहीत यातना ! पहूर येथील जनता त्रस्त

KHOZ MASTER
2 Min Read

 

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पहूर ता जामनेर
रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही आणि मरणानंतर शववाहीकाही उपलब्ध होत नाही . . हि दुर्दैवी परिस्थिती मेळघाटातील नसून
जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहूर येथील आहे .
पहुर हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव . . .खरंतर या ठिकाणी अपघात नवीन नाहीत . . .अपघातांची मालिका थांबता थांबत नाही . . .राष्ट्रीय महामार्गावर ना कुठे सूचनाफलक आहेत ना कुठे सिग्नल यंत्रणा . . .ना कुठे गतिरोधक आहे ना कुठे झेब्रा क्रॉसिंग . . .सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य निरपराध नागरिकांचा बळी जाणे ही बाब आता नित्याची झाल्याने त्याबद्दलही फारसे कोणाला काही वाटत नाही . काहीशी हळहळ व्यक्त होते . .पुन्हा गावकरी आपापल्या कामात व्यस्त होऊन जातात . ग्रामीण रुग्णालयाची अवस्था तर बिकटच आहे . उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेले ग्रामीण रुग्णालय सध्या ‘रेफरिंग सेंटर ‘ झाले आहे .
एकच रुग्णवाहिका असल्याने बऱ्याचदा ती रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जळगावला जाईपर्यंत लगेच दुसऱ्या रुग्णांना रेफर करावे लागत असल्याने त्यांची मात्र गैरसोय होते . . . जिवंतपणी सुरू झालेली ही यातना मरणानंतर तरी कशी थांबणार ? शवविच्छेदनानंतर चक्क खाजगी वाहनातून मृतदेह नातेवाईकांना आपल्या घरी न्यावा लागतो . . . विकास कामांच्या वल्गना केवळ हवेतच असून सामान्य नागरिकांना त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे दुर्दैवी चित्र लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेचे दर्शनच घडवितांना दिसतात . . . . सर्वसामान्य जनता मात्र यामुळे त्रासली असून हे दृष्टचक्र कधी थांबणार हा खरा प्रश्न आहे ?

0 9 3 4 5 8
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *