छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
संभाजीनगर-जळगाव महामार्गावर सोमवारी रात्री ११:३० ला ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने, त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सखाराम मगर (३७) व संजय बारीकराव खटाळ (३८, दोघेही रा.निल्लोड) अशी मयतांची नावे आहेत.कैलास मगर हे भवन येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर तर त्यांच्यासोबत संजय खटाळ वेटर होते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून दोघेही दुचाकीने (एम.एच. २०. एफ.एच.१४१३) निल्लोडकडे निघाले होते. चिंचखेडा येथील एक हॉटेलसमोर ट्रकने (एम.एच.१६.सी.सी.४९४५) अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी ट्रकवर आदळली. दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.वास्तुशांतीपूर्वीच आला काळमॅनेजर कैलास मगर यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. पुढील महिन्यात त्यांच्या घराचा वास्तुशांती सोहळा होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व वडील असा परिवार आहे. संजय खटाळ यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. या दोन्ही मृतांवर निल्लोड येथे मंगळवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.चिंचखेडा भागात झालेल्या भीषण अपघातानंतर घटनास्थळी अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक. या दुर्घटनेत कैलास मगर, संत्र संजय खटाळ यांचा जागीच मृत्यू झाला.दुभाजकाची उंची कमी: छत्रपती संभाजीनगर-जळगाव सिमेंट रस्त्यावरमध्यभागी उभारण्यात आलेल्या दुभाजकाची उंची सुमारे तीन फूट असल्याने रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे चालकांच्या डोळ्यांवर तीव्र झोत पडतो. त्यामुळे समोरील वाहन किंवा रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने दुभाजकाची उंची वाढवून सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
Users Today : 9