मारवाडी समाजाचे आराध्य दैवत श्री शितला माता मंदिर परिसरात स्वच्छता करावी- विकासकुमार बागडी

KHOZ MASTER
1 Min Read

 

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

जालना शहरातील काद्राबाद भागातील दर्गा वेस जवळील निमाजमकालीन प्राचीन मारवाडी समाजाचे आराध्य दैवत श्री शितला माता मंदिर परिसरात साफसफाई करून, पथदिवे बसवावेत, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
याबाबत महापौर वंदना मगरे जालना शहर महानगरपलिका यांना दिलेल्या निवेदनात श्री शितलादेवी मंदिर परिसरात व रस्त्याची स्वच्छता करावी, तात्पुरते शौचालय उभारावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पथदिवे बसवोत, वाहतुक नियंत्रण व पार्कींग व्यवस्था करावी, कचरा संकलनासाठी विशेष पथक नेमावे, व वैद्यकीय मदत व्यवस्था करावी आदि मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मारवाडी, अग्रवाल, माहेश्‍वरी, ब्राह्मण, जैन, माळी, नाई, जाठ तसेच सकल राजस्थानी बहुभाषिक समाजाचे सुमारे 60 हजार पेक्षा जास्त भाविक-भक्त शितला माता पुजा महोत्सवात सहभाग होत असतात. सदरील पुजा दि. 4 मार्च ते 16 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहे. तरी मनपा प्रशासनाने श्री शितला माता मंदिर परिसरात वरिल सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच सद्या परिस्थितीच्या बघुन महिला व मुलांनी सोन्या-चांदीचे दागिणे व महाग वस्तु सोबत आणू नये असे आवाहनही विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

0 9 4 6 3 6
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *