शेगाव :
राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या संतनगरी शेगाव येथे आगमनानंतर त्यांनी Gajanan Maharaj यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल Acharya Devvrat, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच आयुष राज्यमंत्री Prataprao Jadhav, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी करून विविध उपक्रमांची माहिती घेतली.
यानंतर त्यांचे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमस्थळी प्रस्थान झाले.
Users Today : 50