शेगाव :
भारताच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभेद्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. तब्बल ३० जिल्ह्यांतील पोलीस पथके, ३२ श्वान पथके आणि सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा शेगावात दाखल झाला होता. त्यामुळे शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे, बसस्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सातत्याने निरीक्षण सुरू होते.
स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक तसेच बॉम्बशोध व नाशक पथकांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
राष्ट्रपती Droupadi Murmu पहिल्यांदाच शेगावात दाखल झाल्याने जिल्हावासीयांमध्ये उत्सुकतेचे वातावरण होते. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने चोख आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली होती.
Users Today : 50