स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र, किनगावजट्टू येथे गाडगे महाराज जयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

दुसरबीड :

येथून जवळ असलेल्या किनगावजट्टू येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामदास मुर्तडकर, फिरोज शेख तसेच शामराव सातपुते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेश नागरे, रुद्र सातपुते तसेच अध्यक्ष विश्वनाथ वाघमारे यांनी गाडगेबाबांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी राऊत, राजाभाऊ राऊत, विजय राऊत, रघु राऊत, बळी राऊत व बबन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले

0 9 4 6 3 6
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *