बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) :
रूढ अर्थाने निरक्षर असले तरी संत गाडगेबाबांचे निरीक्षण विलक्षण होते. ते खरे लोकशिक्षक होते. गाडगेबाबा म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. दुर्दैवाने त्यांच्या सर्व कीर्तनांचा व उपदेशांचा लिखित स्वरूपात पुरेसा दस्तऐवज उपलब्ध नाही; अन्यथा ते जागतिक स्तरावरील विद्वान म्हणून ओळखले गेले असते, असे गौरवोद्गार प्रा. डॉ. सतीश तराळ यांनी काढले.
वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर बिडवे होते. त्यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
गाडगेबाबा एक चालतेबोलते विद्यापीठ : प्रा. डॉ. सतीश तराळ राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
0
9
4
6
3
6
Users Today : 50
Leave a comment