राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त व्हा : हभप निकम

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा :
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी वेचले. समाजातील अनिष्ट परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत स्वच्छतेचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन हभप निकम गुरुजी यांनी येथे केले.
विरंगुळा भवन, देऊळगाव राजा येथे संत Sant Gadge Maharaj यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, जनसेवा सामाजिक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून हभप निकम गुरुजी, वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक कुळकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रकाश अहिरे, प्रा. विजयकुमार रायमल, प्रा. अशोकराव डोईफोडे, रमेश नरोडे, पंडितराव पाथरकर, बाबुलाल शिवरकर, नंदलाल शर्मा आदी उपस्थित होते. मान्यवरांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

0 9 4 6 3 6
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *