चिखली :
स्थानिक आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य सतीश गव्हले यांच्या अध्यक्षतेखाली संत Sant Gadge Maharaj यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक लक्ष्मीकांत शेटे, श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे, शिक्षक सुधीर शेटे तसेच योगिताताई गालफाडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिताताई गालफाडे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सतीश गव्हले यांनी संत गाडगेबाबांनी गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश दिला, अंधश्रद्धा, जातिभेद आणि व्यसनांविरुद्ध जनजागृती केली, असे सांगितले. त्यांनी स्वतः झाडू हाती घेऊन समाजाला आदर्श घालून दिला. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मानवता व स्वच्छता या मूल्यांवर समाजसुधारणा केल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी तन्वी वानखेडे व वसुधा माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन समृद्धी उसर हिने मानले.
Users Today : 24