बुलढाणा :
राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, म्हसला खुर्द (धाड) येथे राष्ट्रसंत Sant Gadge Maharaj यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रणेते असलेल्या गाडगे महाराजांनी गावोगावी फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “एक वेळ जेवणाचे ताट-लोटा कमी असले तरी चालेल, पण आपल्या मुलांना शिक्षण द्या,” असा मार्मिक संदेश ते कीर्तनातून देत असत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात गौरव वाघ याने साकारलेली राष्ट्रसंत गाडगेबाबांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक मोहन वाघमारे होते, तर अतिथी म्हणून उमेश अपार उपस्थित होते. शिक्षिका अनिता काटकर, शिक्षिका पूजा दळवी तसेच मोहन वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
Users Today : 24