तोरणा गुरूकूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) :
उदयनगर येथील तोरणा गुरूकूल सीबीएसई शाळेत १४ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमात ‘छावा अॅक्ट’च्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच ‘शिवबा राजे’, ‘गण गण गणात बोते’, ‘झपाटलेला’, ‘शिव तांडव स्तोत्र’, ‘बम बम भोले’, ‘स्वर्गात आकाशगंगा’, ‘एरोप्लेन क्रॅश’, ‘क्रिकेट थीम’, ‘दर्या किनारे’ आदी विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषेसह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ‘हे विघ्नहर्ता बाप्पा विघ्नहर्ता’ या गीताने स्नेहसंमेलनाला औपचारिक प्रारंभ झाला.
“तुमचे शिक्षण, तुमचे संस्कार आणि तुमची मूल्ये हा देशाचा भक्कम पाया आहे. आजच्या सादरीकरणातून तोरणा गुरूकूलचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेतही अग्रेसर असल्याचे जाणवले,” असे उद्गार विद्याधर महाले यांनी काढले.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *