आरोग्य मेळाव्यात नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप

KHOZ MASTER
1 Min Read

मालेगाव, दि. २५ (प्रतिनिधी) –

तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ केंद्रीय शाळेत आयोजित आरोग्य मेळाव्यात महिला-पुरुषांची नेत्रतपासणी करण्यात येऊन गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक गवळी, माजी उपसरपंच अनिल जाधव, गणेश गवळी, मंगेश गवळी, गोपाल गवळी तसेच वैद्यकीय पथक उपस्थित होते.
या मेळाव्यात सुमारे ११२ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७९ गरजू नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हार व पुष्प अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक गोपाल गवळी यांच्या वतीने मित्रमंडळाने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी अशोक गवळी, राजू सांगळे, अशोक प्रल्हाद गवळी तसेच भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप देशमुख व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राम विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. राजकारणासोबत समाजसेवा करणे महत्त्वाचे असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमास गजानन नवघरे, नागेश बळी, बनसोडे, वैभव वायचाळ, तुषार मांडे, विवेक गवळी, तेजस आरू, अरुण गवळी, संतोष गवळी, भारत गवळी, शुभम गवळी, दिलीप मोरे, हरीश गवळी, पंढरी गवळी यांच्यासह गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *