मोताळा, दि. २५ (प्रतिनिधी) –
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय येथे मागील २७ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या शिवजयंतीनिमित्त यंदाही शिवपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा पाटील युवक समिती मोताळा तालुकाध्यक्ष दीपक शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. रवींद्र महाजन, नगरसेवक गणेश पाटील, नगरसेवक अमोल देशमुख, वाचनालयाचे संचालक संतोष इंगळे, योगेश महाजन, राहुल अढाव, नरेश इंगळे, अशोक शिरसाट, विजय शिराळ, पांडूभाऊ वानखेडे, धोंडूजी चव्हाण, यादव खाचने, संतोष डोबाळे, श्रीकृष्ण जुनारे, लक्ष्मण दांडगे, प्रवीण घडेकर, श्रीकांत अढाव तसेच अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
Users Today : 45