संग्रामपूर, दि. २५ (प्रतिनिधी) –
तालुक्यातील पिंप्री काथरगाव येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गोपाल इंगळे यांनी संत गाडगे महाराजांची हुबेहुब वेशभूषा साकारून नागरिक व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. सरपंच सुवर्णा टापरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची स्वच्छता केली. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता दिंडीही काढण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान गोपाल इंगळे यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
यावेळी सरपंच सुवर्णाताई टापरे, उपसरपंच कुसुमताई डाखोडे, ग्रामपंचायत सदस्य कडू कांबळे, विलास कंकाळ, शीलाताई मुंडे, पार्वताबाई हातेकर, शिक्षक वाघमारे, गुहाळ, बुंदे, अंगणवाडी सेविका खराटे, अंगणवाडी मदतनीस कंकाळ व मुंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धम्मपाल हातेकर यांच्यासह नाना पाटील, संजय मुंडे, संजय नांदोकार, जगन्नाथ बावस्कर, शीलाबाई हातेकर, मीराबाई चव्हाण, जयश्री कंकाळ, नंदाताई टापरे, ज्योतीताई नांदोकर, शकुंतला बावस्कार, सोपान कंकाळ, आदित्य सरदार, सुपेश डाखोडे, चेतन टापरे, सुयोग मेतकर, भगवान मुंडे, गौरव मुंडे, सुपेश खराटे आदींची उपस्थिती होती
Users Today : 45