पोहा येथे रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

KHOZ MASTER
1 Min Read

कारंजा

श्री संत वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज भागवत सप्ताह व तुकाराम बीज निमित्ताने पोहा येथे १ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम श्री संत वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज संस्थान पोहा आणि दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
१ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संस्थान परिसरात हे शिबिर पार पडणार असून परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सईताई प्रकाश डहाके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तराज डहाके राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत हरिओम महाराज शास्त्री (भागवताचार्य, अमरावती) यांच्यासह नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय कांत, डॉ. सुशील देशपांडे, डॉ. शार्दूल डोंणगांवकर, डॉ. पंकज काटोले तसेच शेखर बंग उपस्थित राहणार आहेत.
पोहा येथील सरपंच शितलताई मंगेशराव मसने यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे समन्वयक आशिष राजेंद्र डहाके असून अध्यक्ष-विश्वस्त मंडळ, नवयुवक मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ, पोहा यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *