चिखलीच्या सुवर्णा कुळकर्णी यांची राज्यस्तरावर झेप पीएम ई-विद्या वाहिनीवर नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) –

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने ‘स्टार्स’ उपक्रमांतर्गत पीएम ई-विद्या वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष डिजिटल मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात चिखली येथील शिक्षिका सुवर्णा कुळकर्णी यांची इयत्ता ९ वीच्या मराठी विषयाच्या अध्यापनासाठी निवड झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाचे प्रक्षेपण नुकतेच करण्यात आले.
कुळकर्णी यांनी या सत्रात प्रख्यात कवी व गीतकार संदीप खरे यांच्या कवितेवर आधारित मार्गदर्शन केले. ‘आयुष्यावर बोलू काही’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या कवी संदीप खरे यांनी स्वतः व्हिडिओ संदेशाद्वारे कवितेमागील भूमिका स्पष्ट केली. ‘कवीची प्रत्यक्ष भेट’ ही अभिनव संकल्पना प्रभावीपणे सादर करण्यासाठी कुळकर्णी यांनी त्यांच्या पाठात कवींच्या व्हिडिओचा समावेश केला होता.
हे शैक्षणिक मार्गदर्शन १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान दररोज चार वेळा प्रसारित करण्यात आले. या पाठामध्ये कवितेचा भावार्थ, रसग्रहण तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सुवर्णा कुळकर्णी यांनी यापूर्वीही ‘ई-बालभारती’ तसेच एससीईआरटी पुणे आयोजित ऑनलाइन लाईव्ह टीचिंग कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व भूगोल विषयांचे वर्ग यशस्वीपणे घेतले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिखली परिसरासह शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *