शिक्षक पतीचे ‘त्या’ महिलेशी अनैतिक संबंध पत्नीला अमानुष छळल्याप्रकरणी कुटुंबासह सहा जणांवर गुन्हा दाखल

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी)

शेगाव येथील एका नामांकित महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या शिक्षक पतीने नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला हुंड्यासाठी तसेच स्वतःच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे तब्बल १४ वर्षे शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बुलढाणा शहरातील चैतन्य वाडी परिसरात राहणाऱ्या सुनीता भगवान सपकाळ (वय ३८) यांचा विवाह २० मे २०११ रोजी भगवान साळूबा सपकाळ (रा. पवारवाडी, शेगाव) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पतीने हुंड्यासाठी तगादा लावत त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. या दाम्पत्याला प्रज्वल व रेयांश अशी दोन मुले आहेत.
दरम्यान, पतीचे अटाळी (ता. खामगाव) येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संबंधांना सुनीता यांनी विरोध केल्यामुळे त्यांना मारहाण व मानसिक छळ सहन करावा लागला. आरोपी पती दारूच्या आहारी गेला असून दारूच्या नशेत घरी येऊन किरकोळ कारणांवरून मारहाण करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सासू गयाबाई साळूबा सपकाळ, दीर दिलीप साळूबा सपकाळ, जाऊ मनीषा दिलीप सपकाळ तसेच रामदास साळूबा सपकाळ यांनीही आधार देण्याऐवजी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. सात ऑक्टोबर २०२५ रोजी छळाची परिसीमा ओलांडल्याने सुनीता यांनी सासर सोडून बुलढाणा येथे माहेरी आश्रय घेतला.
या प्रकरणी सुनीता सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांत पतीसह सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले करीत आहेत

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *