मोताळा येथे अपघातात दिव्यांगाचा मृत्यूमोताळा येथे अपघातात दिव्यांगाचा मृत्यू

KHOZ MASTER
2 Min Read

मोताळा, दि. २५ (प्रतिनिधी)

मलकापूर–बुलढाणा मार्गावरील सांगळद येथे झालेल्या अपघातात ४५ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शिवदास समाधान कांडेलकर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते बोराखेडी येथील रहिवासी होते. आज सकाळी बुलढाणा–मलकापूर मार्गाने जात असताना सांगळद रोडवर त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत कांडेलकर यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा हे असून ते सध्या बोराखेडी येथे वास्तव्यास होते. ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी डॉ. धीरज म्हस्के यांच्या वतीने कक्षसेवक पुरुषोत्तम मार्वे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ अमोल खराडे करीत आहेत.
मोताळा, दि. २५ (प्रतिनिधी) – मलकापूर–बुलढाणा मार्गावरील सांगळद येथे झालेल्या अपघातात ४५ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शिवदास समाधान कांडेलकर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते बोराखेडी येथील रहिवासी होते. आज सकाळी बुलढाणा–मलकापूर मार्गाने जात असताना सांगळद रोडवर त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत कांडेलकर यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा हे असून ते सध्या बोराखेडी येथे वास्तव्यास होते. ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी डॉ. धीरज म्हस्के यांच्या वतीने कक्षसेवक पुरुषोत्तम मार्वे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ अमोल खराडे करीत आहेत.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *