मोताळा, दि. २५ (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक जगाची ओळख करून देण्यासाठी Janata High School येथे ‘बाल आनंद मेळावा’ उत्साही वातावरणात पार पडला.
Janaseva Shikshan Sanstha संचलित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच बाजारहाट, खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहारांचे प्राथमिक धडे देणे हा होता. या अभिनव संकल्पनेमुळे संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले गेले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने घरून तयार करून आणलेल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांची आकर्षक दुकाने शाळेच्या प्रांगणात मांडली होती. कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष दिलीप नाफडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन केले.
या सोहळ्यास ज्येष्ठ संचालक विश्वनाथ सुपे, अरविंद नाफडे, राजेंद्र नाफडे, किरण नाफडे, डिगांबर वाघोदे, प्रकाश पाटील, धुवा झोपे, अनिकेत बहऱ्हाटे, पत्रकार गणेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्याकडून पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वामन सुरळकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.
जनता हायस्कूलमध्ये ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात
0
9
4
6
3
1
Users Today : 45
Leave a comment