बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : राधेश्याम चांडक

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) –

सुलभ पतपुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्यासाठी हातभार लावणारी आणि विविध सामाजिक उपक्रमांतून आनंदाची पेरणी करणारी बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेच्या वतीने यंदाही ‘ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.
‘रन फॉर फॉरेस्ट’ हे ब्रीद असलेली ही मॅरेथॉन १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता गजानन महाराज संस्थान अंतर्गत स्वयंप्रकाश संस्थान, गिरडा (ता. जि. बुलढाणा) येथून सुरू होणार आहे.
या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. १० व २१ किमी गटासाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत करता येणार असून त्यानंतर ऑफलाईन नोंदणी रविंद्र पाटील व सचिन गाढवे यांच्याकडे स्वीकारली जाणार आहे.
दरवर्षी या मॅरेथॉनला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो. यावर्षीही तसाच उत्साह लाभेल, असा विश्वास राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धकांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड, बुलढाणा येथे अधिकृत टी-शर्ट, गुडी बॅग व बीब नंबर वितरित करण्यात येणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशर मेडल, नाश्ता तसेच संपूर्ण मार्गावर वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

0 9 4 7 8 2
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *