आ. सिद्धार्थ खरात यांची अधिसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड सर्वानुमते अभिनंदन प्रस्ताव मंजूर

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर, दि. २५ (प्रतिनिधी)

मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांची विधानसभा सभापतीद्वारा अधिसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अधिसभेत सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या तरतुदीनुसार विधानसभा सभापतींकडून झालेल्या नामनिर्देशनाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अधिसभेतील सर्व सन्माननीय सदस्यांनी या प्रस्तावास अनुमोदन देत आमदार खरात यांचे एकमताने अभिनंदन केले.
या संदर्भात कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी पत्राद्वारे आमदार खरात यांना अधिसभेच्या भावना कळवून त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच विकासात्मक कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा अधिसभेतील सदस्यांनी व्यक्त केली.

0 9 4 6 3 1
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *