गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील योगीधाम परिसरात परमपूज्य योगानंद महाराज यांच्या 69 वा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन-कीर्तन आणि महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने उपस्थित राहून योगानंद बापू महाराज यांचा पुष्पहार व शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
महाराजांनी उपस्थितांना आशीर्वाद देत समाजात सद्भावना, प्रेम आणि आध्यात्मिक मूल्ये जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी उद्धव पवार मा.जिल्हा परिषद सदस्य,उद्धव उषाताई पवार माजी सरपंच तलणी,माणिकराव थिटे,जगदीश राठोड,भुरा पवार,जानकीराम चव्हाण,मोतीराम राठोड रंजित चव्हाण,संभाजी चव्हाण यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती
Users Today : 41