शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे कुशल पैसे द्या

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर, दि. २५ (प्रतिनिधी) :
तालुक्यातील केळी व संत्रा फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सन २०२३ ते २०२५-२६ या कालावधीतील कुशल देयके तत्काळ अदा करावीत, अशी मागणी शिवसेना किसानसेनेचे उपजिप्रमुख अमोल ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२३ पासून २०२५-२६ पर्यंत केळी व संत्रा फळबाग लागवड केली आहे. संबंधित कामाची कुशल बिले कृषी विभागाकडे सादर करण्यात आली असूनही अद्यापपर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
त्यामुळे कुशल बिलाची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ६ मार्च २०२६ पर्यंत देयके न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी अमोल ठाकरे, कैलास कडाळे, शिवाजी अढाव, विठ्ठल गोतमारे, भगवान गोतमारे, प्रकाश गोतमारे, सुनील मुकुंद, गजानन वानखडे, सिद्धार्थ वानखडे, रामदास गोतमारे, संतोष साखरे, विजय गोतमारे, संजय वानखडे, मनोहर अवचार, विक्की पिसे, सतीश गोल्हर आदी शेतकरी उपस्थित होते.

0 9 3 4 9 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *