वर्दडी बुद्रूक, दि. २५ (प्रतिनिधी) :
येथून जवळ असलेल्या सोनोशी येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत महापुरुषांचा इतिहास गीत व नाटकांच्या माध्यमातून सादर केला.
तुळजाभवानी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा संचालित या विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक भास्कर साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक लहुजी पोहरे, प्रभाकर जायभाये, रतन वायाळ, मुंढे, श्रीराम गंडे, संदीप किंगरे, सरपंच मधुकर ईनकर, विकास चव्हाण, दिलीप चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी ‘देवा श्रीगणेशा’, ‘दैवत छत्रपती’, ‘महाड नाशिक पुण्यात भीमराव कडाडला’, ‘इंदोरीकर’ नाटिका, कव्वाली, बंजारा गीते, कोळी गीत, ‘आमदार झाल्या सारखं वाटतंय’, पोवाडा, ‘नवरी नटली’, ‘धिंगाणा’, ‘सुनो गौर से’, ‘रडू नको’, ‘पोलिस वाल्या’, ‘बुरगुंडा’, ‘झुलवा पाळणा’, ‘तुझ्या रुपाचं चांदणं’, ‘शेतकरी आत्महत्या’ नाटक आदी विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अनिल आघाव, शिक्षक संजय मोरे, शिक्षिका मिनाक्षी आघाव, गंगासागर आघाव, सोनाली मोरे, रिना आटोळे, शुभांगी आटोळे, वैष्णवी खरात, सुनिल आघाव, दिलीप गंडे, गोविंद वायाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारल्या विविध वेशभूषा
0
9
3
4
9
6
Users Today : 0
Leave a comment