डोणगाव, दि. २५ (प्रतिनिधी) :
Dongav Police Station अंतर्गत येणाऱ्या लोणीगवळी येथे २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोणीगवळी येथील रहिवासी तुकाराम दोडके व त्यांची पत्नी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कारंजा लाड येथे गेले होते. ते परत घरी आल्यानंतर घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तुटलेला आढळला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले दिसून आले.
लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याची पट्टीपाते (वजन ३० ग्रॅम), सोन्याचे कानातील झुमके (३ ग्रॅम), दोन सोन्याच्या अंगठ्या (एकूण वजन ८ ग्रॅम), तसेच चांदीची हातातील पट्टी (१० ग्रॅम) असा एकूण सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले.
लोणीगवळीत एक लाख अट्ठावीस हजारांची चोरी
0
9
3
4
9
6
Users Today : 0
Leave a comment