प्रत्येक कामगाराने सदृढ, निरोगी आयुष्यासाठी सजग राहावे : जाधव

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) :
प्रत्येक कामगार व कर्मचाऱ्याने सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी नेहमी सजग राहावे, असे आवाहन Maharashtra State Road Transport Corporation चे विभागीय वाहतूक अधिकारी Digambar Jadhav यांनी केले.
Maharashtra Kamgar Kalyan Mandal अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी विभागीय कार्यशाळा, बुलढाणा येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात District General Hospital Buldhana येथील वैद्यकीय चिकित्सकांनी बीपी, शुगर, घसा व चर्मरोगासंबंधित आजारांचे निदान केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार अधिकारी राहुल तांबडे, विभागीय लेखाधिकारी अनिल बहिरम, विभागीय भांडार अधिकारी अमोल तळोकार, कृष्णा सिनकर, विशाल हिवाळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर केणे, प्रा. डॉ. हरीष साखरे, प्रा. अर्जुन बोकाडे, वैद्यकीय चिकित्सक डॉ. वसीम चौधरी, डॉ. चैतन्य जाधव, डॉ. मृणाली कदम, डॉ. साई कृष्णा, समाधान खुरदे, योगेश एकडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या चमूचे तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वागत कामगार कल्याण केंद्राचे विद्या किशोर शिंदे, निलेश प्र. देशमुख व प्रमिला उबरहंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमादरम्यान दिगंबर जाधव व राहुल तांबडे यांनी मनोगत व्यक्त केले. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती होती. आभार प्रदर्शन विद्या किशोर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश प्र. देशमुख व प्रमिला राजू उबरहंडे यांनी परिश्रम घेतले.

0 9 3 4 9 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *