प्रा. भाग्यश्री उबाळे यांना आचार्य पदवी प्रदान

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी) :
Sant Gadge Baba Amravati University येथे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या बेचाळिसाव्या दीक्षांत समारंभात प्रा. भाग्यश्री विलास उबाळे यांना आंतरविद्याशाखेतील ‘शिक्षणशास्त्र’ विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या संशोधनाचा विषय “माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठीच्या कृती कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास” हा आहे. त्यांनी हा अभ्यासक्रम Government College of Education Buldhana येथील प्रा. डॉ. नुतन भानुदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.
प्रा. डॉ. भाग्यश्री उबाळे यांनी यापूर्वी यूजीसी नेट, महाराष्ट्र सेट, महाराष्ट्र टीईटी पेपर १ व पेपर २ तसेच क्रीडा व संगीत अशा विविध परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. तसेच अमरावती विद्यापीठातून एम.एड.मध्ये प्रथम मेरिट आणि एम.ए. (इतिहास) विषयात पाचवी मेरिट मिळविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नल्स आणि परिषदांमध्ये त्यांच्या संशोधनपर लेखांचे इंग्रजी भाषेत प्रकाशन झाले आहे.
प्रा. डॉ. भाग्यश्री उबाळे यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील विलास उबाळे, आई शोभा उबाळे, भाऊ प्रशांत उबाळे, बहीण अश्विनी उबाळे, मामा प्रा. तुकाराम बाऊ तसेच सर्व प्राध्यापकवृंदांना दिले आहे.

0 9 3 4 9 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *