समाजाचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य : डॉ. बावस्कार

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा, दि. २५ (प्रतिनिधी) :
“माझा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला, त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. गरिबांची सेवा करतच मी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलो. ज्या समाजात आपला जन्म झाला, त्या समाजाचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त Dr. Himmatrao Bawaskar यांनी केले.
स्थानिक नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी Indian Medical Association, नांदुरा शाखेतर्फे पहिल्या स्व. डॉ. वसंतरावजी नांदुरकर स्मृतीप्रित्यर्थ ‘आदर्श डॉक्टर’ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. व्ही. देशमुख होते. यावेळी Datta Meghe Institute of Medical Sciences चे माजी कुलगुरू वेदप्रकाश मिश्रा यांनी मनोगत व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रसिद्ध झालेल्या युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाला ‘आदर्श डॉक्टर’ पुरस्कार प्रदान होणे हा दुर्मिळ योग असल्याचे नमूद केले.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील, नगराध्यक्षा मंगलाताई मुडेकर, डॉ. राजेश राजोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विचारपीठावर डॉ. प्रमोदिनी बावस्कार, डॉ. शिवदास गाडेकर महाराज, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अशोक बावस्कार, डॉ. सुशिला नांदुरकर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

0 9 3 4 9 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *