शेंदुर्जन, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
लमाण आणि बंजारा समाजाच्या प्रलंबित मागणीला यश
राज्यातील तांडे आणि वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Government of Maharashtra ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या तांड्यांची लोकसंख्या ३०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा तांड्यांना स्वतंत्र ‘महसूली गाव’ म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या लमाण आणि बंजारा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तांड्यांना महसूली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा निधी थेट तांड्यांच्या विकासासाठी वापरता येणार आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शाळा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आता इतर गावांवर अवलंबून राहावे लागणार नाही. जमिनीचे सातबारा उतारे आणि इतर आवश्यक दाखले स्थानिक पातळीवर मिळविणे सुलभ होणार आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय बदल नसून तांड्यांवरील बांधवांच्या अस्मितेचा व स्वावलंबनाचा विजय मानला जात आहे.
जिल्हाधिकारी स्तरावर अंमलबजावणी
या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येणार असून, पात्र तांड्यांचे सर्वेक्षण करून त्यांना महसूली गावाचा दर्जा देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३०० लोकसंख्या असलेल्या तांड्यांना आता मिळणार महसूली गावाचा दर्जा!
0
9
3
4
9
6
Users Today : 0
Leave a comment