चिखली, दि. २५ (प्रतिनिधी) :
“जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण” हा उदात्त विचार घेऊन Sant Nirankari Mandal यांच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत चिखली येथील वायझडी तलाव परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन Satguru Mata Sudiksha Ji Maharaj आणि Nirankari Rajpita Ramit Ji यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाखांनी सक्रिय सहभाग घेतला. बुलढाणा शाखेच्या वतीने येळगाव तलाव, तर शेगाव, लोणार, मेहकर, नांदुरा, मलकापूर आणि खामगाव येथील शाखांनी स्थानिक जलस्रोतांची स्वच्छता केली. चिखली शाखेच्या वतीने वायझडी तलावाची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी जिल्हा संयोजक तथा ज्ञानप्रचारक शालिकराम चवरे, चिखली नगरपरिषदेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, नगरसेवक दिपक वाधवानी, सुरेंद्र ठाकूर, पुरुषोत्तम वायाळ, अमोल लहाने, श्रीराम झोरे आणि गोकुळ शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. चवरे गुरुजी यांनी संत निरंकारी मंडळाच्या सेवाकार्याची माहिती दिली.
आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांनी मंडळाच्या निस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक करत आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ आचरणातून प्रकट व्हावी : सतगुरू माता सुदीक्षाजी
दिल्ली येथे आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात अमृतमय विचार व्यक्त करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या की, बाबाजींची शिकवण केवळ स्मरण करण्यासाठी नसून ती जीवनात अंगीकारण्यासाठी आहे. खरी श्रद्धांजली शब्दांनी नव्हे तर कृतीतून अर्पण केली जाते. प्रेम, सेवा, करुणा आणि समरसता या मूल्यांचा स्वीकार दैनंदिन जीवनात झाला पाहिजे.
भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ एक अभियान नसून ती एक जीवनदृष्टी असून भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी आहे.
प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत चिखलीत वायझडी तलावाची स्वच्छता शेकडो स्वयंसेवकांचा सहभाग; ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाचा चौथा टप्पा
0
9
3
4
9
6
Users Today : 0
Leave a comment