अंढेरा, दि. २६ (प्रतिनिधी)
अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित महिलेवर धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२५ वर्षीय विवाहित महिला मजुरी करून उदरनिर्वाह करते. सुमारे वर्षभरापासून ती शेतात एकटी मजुरीसाठी जात होती. आरोपीने तिला एकटी पाहून प्रथम तिचे फोटो काढल्याचे सांगितले जाते. त्याबाबत विचारणा केल्यानंतर तो तेथून निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन आरोपीने तिचा हात धरून जबरदस्ती केली व अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून “ही बाब कोणाला सांगितल्यास पती व मुलांना ठार मारू, तसेच व्हिडीओ व्हायरल करू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या धमकीच्या आधारे आरोपीने वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
सन २०२४ मध्ये पीडिता माहेरी असताना आरोपीने तिच्या कुटुंबीयांना फोटो दाखवण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच ९ फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील मक्याच्या शेतात नेऊन जबरदस्ती केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेने २४ फेब्रुवारी रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी शादाब खान सखावत खान (रा. मेरा खुर्द) याच्याविरुद्ध Bharatiya Nyaya Sanhita मधील कलमे ६४, १२६(२), ३५१(२) तसेच Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989 अंतर्गत कलमे ३(१)(र), ३(१)(स), ३(२)(व्हीए), ३(२)(५), ३(१)(डब्ल्यू)(१)(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
0
9
4
6
2
8
Users Today : 42
Leave a comment