राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. आशुतोष गुप्ता ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारातील कार्याची दखल

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. २६ (प्रतिनिधी)
चिखलीचे सुपुत्र डॉ. आशुतोष गुप्ता यांना आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम Droupadi Murmu यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ डॉ. गुप्ता आयुर्वेद चिकित्सा क्षेत्रात कार्यरत असून, समाजात आयुर्वेदाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत Ministry of AYUSH आणि Akhil Bharatiya Ayurveda Mahasammelan यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गुप्ता कुटुंबीय उपस्थित होते.
“प्रेरणा देणारा सन्मान”
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. आशुतोष गुप्ता यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, संत गजानन महाराजांच्या नगरीत आणि स्वतःच्या जिल्ह्यात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आयुर्वेदाच्या सेवेला अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

0 9 4 6 2 8
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *