धाड, दि. २६ (प्रतिनिधी)
धाड पोलीस स्टेशन हद्दीतील दुधा (ता. बुलढाणा) येथे असलेल्या ‘गजानन ज्वेलर्स’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकत सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वरूड (ता. बुलढाणा) येथील रहिवासी वैभव अनंत खांडवीकर (वय २८) यांचे दुधा येथे ‘गजानन ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. नियोजनबद्ध पद्धतीने दुकानात प्रवेश करून काही मिनिटांतच चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
चोरट्यांनी चांदीच्या ५७६ अंगठ्या (अंदाजे १६०० ग्रॅम) किंमत सुमारे ३ लाख रुपये, तसेच चांदीच्या ३० चैन पट्ट्या व ५० जोडवे (अंदाजे ८०० ग्रॅम) किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी वैभव खांडवीकर यांनी धाड पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी Bharatiya Nyaya Sanhita कलम ३०५, ३३१(४), ३३१(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे
दुधा येथील ‘गजानन ज्वेलर्स’वर मध्यरात्री दरोडा ४ लाख ८० हजारांचे चांदीचे दागिने लंपास
0
9
4
6
2
7
Users Today : 41
Leave a comment