मोताळा, दि. २६ (प्रतिनिधी):
शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील प्रा. पुरुषोत्तम चाटे यांना नुकतेच पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले.
प्रा. चाटे हे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी “पश्चिम विदर्भातील बदलत्या पीकरचनेचा अभ्यास (कालावधी २०१०-११ ते २०१९-२०)” या कृषी क्षेत्राशी निगडित महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनामध्ये शेतीतील बदलती पीकरचना, पीक पद्धती, सिंचित व कोरडवाहू शेतीतील समस्या, विविध सिंचन पद्धती, कृषीपूरक व्यवसाय, शासनाच्या कृषीविषयक योजना, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती, शेतमाल हमीभाव योजना तसेच शेतीतील समस्या व संधी यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ तसेच प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Users Today : 41