बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी)
येथील भौतिकोपचार तज्ञ व आहारतज्ञ डॉ. साधना अशोक भवटे यांना Sant Gadge Baba Amravati University कडून ‘आहारशास्त्र व पोषण’ या विषयात २३ फेब्रुवारी रोजी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
यावर्षी आहारशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळविणाऱ्या त्या विद्यापीठातील एकमेव संशोधक ठरल्या आहेत. आवड, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. महिलांनी योग्य संधी व कौटुंबिक पाठबळ मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतात, हे त्यांनी आपल्या यशातून अधोरेखित केले आहे.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना पती डॉ. अशोक भवटे, कुटुंबीय तसेच पीएचडी मार्गदर्शक डॉ. अंजली राजवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
साधना भवटे यांना पीएचडी पदवी प्रदान
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment