दाताळा (प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या माळेगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत २३ फेब्रुवारी रोजी Sant Gadge Baba यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात कडू हिवाळे यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पूजन करून झाली. यावेळी मुख्याध्यापक सुरडकर, सहाय्यक अध्यापक प्रशांत देशमुख तसेच शिक्षक हेमंत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना वाहिली.
गट ग्रामपंचायत कार्यालय (माळेगाव) येथेही जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरपंच निनाजी बढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपसरपंच नाना इंगळे व ग्रामसेवक उमेश इंगळे यांनी पूजन केले.
या प्रसंगी संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. समाजप्रबोधन, स्वच्छता अभियान व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाला भूपेश भंगाळे, अतुल इंगळे, संतोष केणे, चतरसिंग राजपूत, ज्ञानदेव जंगले, गजानन केणे, दगडू पाटील, विनोद दुर्योधन, नारायण पाटील, वैभव केने, कपिल हिवाळे, गजानन मायकर, गोपाल राजपूत, किशोर भंगाळे, सुभाष पाटील, रोहन राजपूत, रमेश भंगाळे, श्रीराज पाटील, निखिल हिवाळे, सुरेंद्र सोनवणे, कुलदीप राजपूत, आकाश राजपूत आदी उपस्थित होते.
जि.प. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन
0
9
4
6
2
0
Users Today : 34
Leave a comment