स्वच्छता अभियानातून संत गाडगे बाबा यांना आदरांजली

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर, दि. २६ (प्रतिनिधी):
वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि लोककलावंत फाऊंडेशन यांच्या वतीने पालघरवासीयांच्या परिसरात तसेच वाचनालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्हॉइस ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष संतोष मलोसे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष रफिक कुरेशी, संतोष मलोसे, शरद वानखेडे, गणेश राऊत आदींनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
यानंतर जानेफळ रस्ता व वाचनालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमासाठी रफिक कुरेशी, शरद वानखेडे, बबन राऊत, गजानन सोनुने, गणेश राऊत आदींनी परिश्रम घेतले.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *